प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

सुस्वागतम् !संकेतस्थळी आपले स्वागत आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था २००२ मध्ये पिंपळस रामाचे येथे झाली. कर्मवीर काकासाहेब वाघ माध्यमिक दर्जेदार शिक्षण देणे हा हेतू आहे. स्व. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ की जे एक विख्यात सामाजिक कार्यकर्ते व नेते होते यांनी शाळेची स्थापना केली. त्यांचे निधनानंतर संस्थेची सूत्रे मान. श्री बाळासाहेब वाघ यांचेकडे आली. काकासाहेब वाघ यांचे पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी हे आदर्शवत कार्य सुरु ठेवले आहे.

वैशिष्टये

 • उच्च विद्याविभूषित, तज्ञ, अनुभवी व कार्य समर्पित स्टाफ.
 • उत्तम शैक्षणिक दर्जा.
 • विद्यार्थी केंद्रित अध्ययन आणि अध्यापन.
 • अविरत श्रम व उत्कृष्ट कार्य यांवर ठाम विश्वास.
 • इ. ८ वी ते इ. १० वी संगणक शिक्षण.
 • नेतृत्व गुणांस चालना देणे हेतू सहशैक्षणिक व अभ्यासक्रमपूरक उपक्रम, खेळ व गट उपक्रम यांस महत्व.
 • भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणा-या उत्सव आणि दिनविशेष यांचे साजरीकरण.
 • स्थळ भेट, सहल व सांस्कृतिक कार्यक्रम यांद्वारे प्रात्यक्षिक ज्ञान.
 • शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता ज्यादा वर्ग.
 • सर्वसाधारण व कमकुवत विद्यार्थ्यांकरिता ज्यादा अध्यापन.
 • पालक-शिक्षक-विद्यार्थी यांची परिसंवादात्मक चर्चा सत्रे व व्याख्याने.
 • सुसज्ज प्रयोगशाळा, कार्यशाळा व ग्रंथालय.
 • शिक्षकांसाठी मार्गदर्शन वर्ग, कृती सत्रे व चर्चा सत्रे.
 • आधुनिक सोयीसुविधा व चित्रकला कक्ष.
 • एन. सी. सी., एम. सी. सी., स्काऊट, रोव्हर, रेंजर.
 • हरित सेना व पर्यावरण शाखा व इतर बरेच विभाग कार्यरत आहेत.

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events