प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

संस्थेविषयी

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था संचलित कर्मवीर काकासाहेब माध्यमाची शाळा असून दर्जेदार शिक्षण देणे या हेतू सुरुवात झाली. स्व. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांसारख्या विख्यात सामाजिक कार्यकर्ते व नेते यांनी या शाळेची स्थापना केली. काकासाहेबांचे निधनानंतर संस्थेची सूत्रे त्यांचे सुपुत्र मान. श्री बाळासाहेब वाघ यांचेकडे आली. काकासाहेब वाघ यांचे पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी हे आदर्शवत कार्य सुरु ठेवले आहे.

क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक विषयी

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था ही नाशिक जिल्ह्यातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ ह्या धोरणी व दूरदृष्टी असलेल्या नेत्याने सन १९७० मध्ये संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील जनतेच्या उद्धारासाठी शिक्षणाचे महत्व त्यांनी जाणले आणि त्याचा आरंभ त्यांनी निफाड तालुक्यात शाळा सुरु करुन केला. त्यानंतर हंसराज सुरजी चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक या ट्रस्टचे सुपरिचित दानशूर स्व. काकुसेठ उदेशी यांचेकडून शिक्षण संस्थेस २३ एकर जमीन (जागा) मिळाली. क. का. वाघ शिक्षण संस्थेने सदर जागेचा विनियोग करून “हिराबाई हरिदास विद्यानगरी” या नावाचे एक आदर्श तांत्रिक संकुल उभारले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नितांत सुंदर अशा या संकुलात अभियांत्रिकी महाविद्यालय (इंजिनिअरिंग कॉलेज) व दोन तंत्र निकेतन विद्यालये (पॉलिटेक्निक कॉलेजेस) यांचा समावेश आहे. या दोन पैकी एक तंत्र निकेतन विद्यालय हे विशेषत्वाने केवळ महिलांकरिता आहे. कालांतराने क. का. वाघ शिक्षण संस्थेने सरस्वती नगर, नाशिक या परिसरात कृषी तंत्र, कृषी अभियांत्रिकी, शिक्षण शास्त्र, नर्सिंग, ललित कला, प्रस्तुती कला (कला आविष्कार) या सारख्या शिक्षण क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्था सुरु केल्या. संस्थेतर्फे नाशिक शहरामध्ये इंग्रजी माध्यमाच्या चार शाळाही चालविल्या जात आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून युवकांना सबळ करण्याचे स्वप्न उराशी बाळगून क. का. वाघ शिक्षण संस्थेने नाशिक, भाउसाहेबनगर, काकासाहेबनगर व चांदोरी येथे कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र या शाखांमधील वरिष्ठ महाविद्यालये सुरु केली. स्थानिक परिसरात महाविद्यालयांच्या अभावामुळे जे शेतकरी उच्च शिक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या मुलांसाठी ही वरिष्ठ महाविद्यालये उपयुक्त आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देणे हेतू अगदी अलीकडच्या काळात चांदोरी गावामध्ये तंत्र निकेतन विद्यालयाची स्थापना झाली.
अगदी वाजवी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे क. का. वाघ शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. सर्व संस्थामध्ये गुणवत्ता संस्कृती विकसित करण्यात आली आहे. सर्व संस्थाकडे अत्याधुनिक साहित्य, साधनसामग्री, संगणक व इंटरनेट जोडणीने सुसज्ज असलेल्या उच्च तंत्र विकसित प्रयोगशाळा आहेत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या इतर सुविधांमध्ये व्यायामशाळा, खेळ प्रशिक्षण, मुलां-मुलींसाठी वसतीगृह, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था इ. सुविधांचा समावेश होतो. अध्यापन, संशोधन, समुपदेशन, मार्गदर्शन, आखणी व परीक्षण यांमध्ये निरंतर कार्यरत असलेला उच्च धेय्य प्रेरित व विद्याविभूषित कर्मचारी संच ही सर्व संस्थांची बलस्थानं आहेत.
कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले असून २४ संस्थांमध्ये १५००० पेक्षा अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमातील के. जी. ते पीएच. डी. चे शिक्षण घेत आहेत. सदर संस्थांमध्ये १४०० पेक्षा अधिक कर्तव्यतत्पर कर्मचारी भारतीय नीति-मूल्यांची जोपासना करीत क. क. वाघ शिक्षण संस्था जागतिक दर्जाची बनविणे कामी झटत आहेत.

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events